नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी २७१ खाटा उपलब्ध

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार 656 एवढी आहे.
नांदेड जिल्हा कोरोना मिटर
नांदेड जिल्हा कोरोना मिटर
Published On

नांदेड : जिल्ह्यात रविवारी (ता. २५) प्राप्त झालेल्या 891 अहवालापैकी सहा अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे सहा तर अँटिजेन तपासणीद्वारे एक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 142 एवढी झाली असून यातील 87 हजार 439 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 78 रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 271- beds- available -for -corona- sufferers- in -Nanded district

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या दोन हजार 656 एवढी आहे. रविवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा दोन, नांदेड ग्रामीण एक, नायगाव एक, अर्धापूर एक तर ॲटीजन तपासणीद्वारे कंधार एक असे एकूण सहा बाधित आढळले. रविवारी जिल्ह्यातील सात कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मुखेड कोविड रुग्णालय पाच, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

हेही वाचा - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग... पहा व्हिडिओ

रविवारी 47 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी चार, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल तीन, देगलूर कोविड रुग्णालय तीन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण चार, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33 व्यक्ती उपचार घेत आहेत. रविवारी रोजी सायंकाळी पाचवाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 142 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याचा कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 47 हजार 497

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 45 हजार 425

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 142

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 439

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

रविवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 00

रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-47

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-47

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com